Monday, March 16, 2020

श्रीस्वामीचरित्रसारामृत

*🌻श्री स्वामी समर्थ🌻*

*श्री स्वामीं समर्थ महाराजांना जर खरच जाणून घेण्याची इच्छा असेल तर श्री विष्णू बळवंत थोरात यांनी लिहिलेल्या श्रीस्वामीचरित्रसारामृत या पोथीमधील ही कवने आचरणात आणणे जरुरीचे आहे.*🙏🏼

*अध्याय पहिला*.
कर्ता आणि करविता l
तूची एक स्वामींनाथा l
माझिया ठायी वार्ता l
मीपणाची नसेची ll
*अध्याय दुसरा*.
कामना धरोनी जे भजती l
होय त्यांची मनोरथ पुर्ती l
तसेची निष्काम भक्तांप्रती l
कैवल्यप्राप्ती होतसे ll
*अध्याय तिसरा*.
परी जयाचे चरण l
दुर्लभ सद्भभक्तीवाचोन l
केल्यासी नाना साधन l
भावावीण सर्व व्यर्थ ll
*अध्याय चवथा*.
न लगे करणे तीर्थाटन l
योगाभ्यास होमहवन l
सांडोनिया अवघा क्षीण l
नामःस्मरण करावे ll
*अध्याय पाचवा*.
गंगाजळ जैसे निर्मळ l
तैसे व्हावे मन कोमल l
तुजसी स्तविता प्रेमळ l
सत्वर त्याते पावसी ll
*अध्याय सहावा*.
भक्ती नाही अंतरी l
दांभिक साधनांते करी l
तयाते स्वामी नरहरी l
प्रसन्न कैसे होतील ll
तयानी माजविली ढोंगे l
आणि केली नाना सोंगे l
भक्तीविण हटयोगे l
स्वामीकृपा न होय ll
*अध्याय तेरावा*.
उगीच करीती दांभिक भक्ती l
त्यावरी स्वामी कृपा न करीती l
सदभावे जे नमस्कारीती l
त्यावरी होती कृपाळू ll
*अध्याय चौदावा*.
आम्ही आहो स्वामीभक्त l
मिरवू नये लोकांत l
जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ l
निशफळ भक्ती तयाची ll
दंभे षोडशोपचारे पूजिता l
प्रिय नव्हेची समर्था l
भावे पत्रपुष्प अर्पिता l
समाधान स्वामीं ते ll
*अध्याय पंधरावा*.
न लगे करणे तीर्थाटन l
हटयोगादीक साधन l
वेदाभ्यास शास्त्रज्ञान l
मोक्ष साधना कारणे ll
अंतरी स्वामीभक्ती जडता l
चारी पुरुषार्थ येती हाता l
पाप ताप दैन्य वार्ता l
तेथे काही नुरेची ll
*अध्याय सतरावा*.
लोकापवादाचे मानी भय l
तो भक्ती करील काय l
प्रेमानंद चित्ता नोहे l
भजनी मन लागेना ll
*अध्याय आठरावा*
धन्य गुरूचें महिमानl
पादुका स्पर्श करोनl
जहाले तत्काळ ब्रम्हज्ञानl
काय धन्यता वर्णावी ll
*अध्याय एकोणिसावा*
उठोनियां करिती स्तुती 
धन्य धन्य हे यतिमूर्ती 
केवळ परमेश्वर असती 
रूप घेती मानवाचे
*अध्याय विसावा*
जय जया जी करूना करा 
जयजयाजी यतिवरा 
भक्तजन संतापहरा
सर्वेश्वरा गुरुराया
*अध्याय एकविसावा*
अंगी सर्वदा विनय वसो
वृथाभिमान तो नसो 
सर्व विद्या सार गवसो
भक्त श्रेष्ठालागुनी

🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮

Thursday, February 6, 2020

श्री_शंकर_महाराज_स्तवन

#सदगुरु_श्री_शंकर_महाराज_लीला_व_स्तवन
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

#हैद्राबादच्या_नवाबाची_अखेरः-

हैद्राबादचा पहिला निजाम महाराजांचा भक्त होता. त्यानंतर त्याच्या गादीवर आलेल्या दुसऱ्या निजामाने आपल्या दिवाणाकरवी महाराजांना हाकलून दिले. त्यांना हा अपमान सहन झाला नाही. त्यांनी गावाबाहेर नदीकिनारी आपला मोर्चा वळवला. गावात पाऊस वादळ सुरू झाले. नदीने अक्राळविक्राळ रूप धारण केले. गावात पाणी वाढू लागले. निजाम घाबरला. त्याचा दिवाण सालारजंग याच्या सांगण्याने निजामाला आपली चुक समजली. निजामाने गावाबाहेर जाऊन श्री शंकर महाराजांना राजवाड्यात आणले. अपमानाबद्दल क्षमा मागितली. राजसिंहासनावर बसवून पूजा केली. तेव्हा महाराज शांत झाले. खणानारळाने नदीची ओटी भरल्यावर पाणी ओसरले. आणि तसे खरेच झाले. श्री शंकर महाराज निजामाला म्हणाले "गुरूचरित्रातील तू धोबी. मीच तुला राज्य दिले. तू मला विसरलास? तुझ्या वैभवाचा अंत जवळ आला आहे. तुझे राज्य लवकरच संपेल. ते वाचवण्यास आलो होतो. पण आता ते शक्य नाही." असे बोलून महाराज तडक पुण्याला आले. 

श्री शंकर महाराज- एक अनाकलनीय गूढ सत्पुरूष.

शंकर महाराजा बाबा बाबत दुर्गाअष्टमीचे एक विशेष महत्व आहे. शंकर महाराजां बद्दल शंकर महाराज कळण्यासाठी कित्येक जन्म घेतले तरी महाराज काय आहेत कुणाला ही कळणार नाहीत. महाराज म्हणजे सिगारेट पिणे, चहा पिणे, किंवा दारु पिणे, चमत्कार करणे, हे नाही. महाराजांनी काय सांगितले 'मुझे वो ही जानता है जो खुद को समझता है' याचा अर्थ काय होतो? आपण शंकर महाराजांच्या समोर ऊभे राहुन जर पाहिले तर आपले मन काय म्हणते? विचारा मनाला महाराज सिगारेट दारू चहा पितात का? ऊत्तर नाही म्हणून येईल. कारण आपण महाराजांना आतुन पहातो. महाराज सांगतात तुम्ही माझे बाह्यवर्तन पाहु नका, आतला शंकर ओळखा. अहो महाराजांना फक्त प्रेम पाहीजे. शंकर महाराज म्हणजे प्रेम फक्त प्रेम. महाराज नापासांची शाळा चालवतात. पहील्या रांगेतील व शेवटच्या रांगेतील सर्वांवर महाराजांचे सारखेच लक्ष असते. महाराजांना वशिला चालत नाही. जो फार पुजा-अर्चा करतो व जो काहीच करित नाही, दोघेही महाराजांना प्रिय. अहो महाराजांना अंतकरणा पासुन हाक मारा, महाराज हजर. महाराज प्रत्येक भक्ताच्या हृदयात विराजमान आहेत हाक मारुन पहा.
श्री शंकर महाराज म्हणजेच साक्षात दत्तगुरुंचा अवतार. श्रीपाद श्रीवल्लभ मीच आहे हे त्यांचे अवताराचे स्वरूप (श्री शंकर लीलेमध्ये अध्याय ४ मध्ये दिलेला संदर्भ) याची प्रचिती आजही भक्तांना येते. ज्या भक्तांना शक्य होईल त्यांनी "श्री शंकर महाराज स्तवन" पठण करावे व संकट मुक्त व्हावे हि नम्र विनंती.

#श्री_शंकर_महाराज_स्तवन*

#संतवर्य_श्री_योगिराज_प्रभु_शंकरमहाराज 
#वंदन करुनी चरणि अर्पितो भक्तीचा साज।।१।।
#अतर्क्यलीला, अगाध महिमा, अमर्याद करणी 
#सदैव आम्ही नतमस्तक हो, आपल्याच चरणी।।२।।
#इष्टदेवता ग्रामदेवता स्थानदेवताही 
#सर्व_देवता आमच्या अगदी आहेत हो तुम्ही।। ३।।
#सकलहि देवांच्या रूपात तुम्ही दर्शन देत 
#अधिकार_हा_प्रचंड तुमचा कळूनिया येत।।४।।
#अशक्य जे जे जगी, सहज ते तुम्हालाच शक्य 
#तुम्ही कोण? हे ओळखणे ही मानवा न शक्य।।५।।
#जी जी इच्छा मनी धरावी पूर्ण तुम्ही करता 
#जे जे तुमच्या मनात येईल, करून दाखविता।।६।।
#भूत भविष्य नि वर्तमान हे तुमच्या हातात 
#महाकाळ हा तुम्हापुढे हो होई भयभीत।।७।।
#तुम्हा पाहणे, तुम्हांस स्मरणे, घेणे दर्शन 
#भाग्यविण या गोष्टी साऱ्या, येती ना घडुन।।८।।
#तुमच्या चरणी सतत आमची वाढावी निष्ठा 
#अयोग्य गोष्टी आम्हाला हो वाटाव्या विष्ठा।।९।।
#धरले आम्ही भावे तुमचे, जगी घट्ट चरण 
#सोडणार कधि नाही आम्ही, आले जरी मरण।।१०।।
#नित्य घडावे स्मरण नि पूजन, देहच रंगावा 
#शंकर महाराजांचा जयजयकार मुखी व्हावा।।११।।
#अकरा कवनांचे हे स्तोत्र 
#पठण करता दिनरात 
#विजयी होईल सर्वत्र 
#कामना पूर्ण होतील।।१२।।
।। #संतवर्य_योगीराज_सद्_गुरु_राजाधिराज_शंकर_महाराज_की_जय ।।