Monday, March 16, 2020

श्रीस्वामीचरित्रसारामृत

*🌻श्री स्वामी समर्थ🌻*

*श्री स्वामीं समर्थ महाराजांना जर खरच जाणून घेण्याची इच्छा असेल तर श्री विष्णू बळवंत थोरात यांनी लिहिलेल्या श्रीस्वामीचरित्रसारामृत या पोथीमधील ही कवने आचरणात आणणे जरुरीचे आहे.*🙏🏼

*अध्याय पहिला*.
कर्ता आणि करविता l
तूची एक स्वामींनाथा l
माझिया ठायी वार्ता l
मीपणाची नसेची ll
*अध्याय दुसरा*.
कामना धरोनी जे भजती l
होय त्यांची मनोरथ पुर्ती l
तसेची निष्काम भक्तांप्रती l
कैवल्यप्राप्ती होतसे ll
*अध्याय तिसरा*.
परी जयाचे चरण l
दुर्लभ सद्भभक्तीवाचोन l
केल्यासी नाना साधन l
भावावीण सर्व व्यर्थ ll
*अध्याय चवथा*.
न लगे करणे तीर्थाटन l
योगाभ्यास होमहवन l
सांडोनिया अवघा क्षीण l
नामःस्मरण करावे ll
*अध्याय पाचवा*.
गंगाजळ जैसे निर्मळ l
तैसे व्हावे मन कोमल l
तुजसी स्तविता प्रेमळ l
सत्वर त्याते पावसी ll
*अध्याय सहावा*.
भक्ती नाही अंतरी l
दांभिक साधनांते करी l
तयाते स्वामी नरहरी l
प्रसन्न कैसे होतील ll
तयानी माजविली ढोंगे l
आणि केली नाना सोंगे l
भक्तीविण हटयोगे l
स्वामीकृपा न होय ll
*अध्याय तेरावा*.
उगीच करीती दांभिक भक्ती l
त्यावरी स्वामी कृपा न करीती l
सदभावे जे नमस्कारीती l
त्यावरी होती कृपाळू ll
*अध्याय चौदावा*.
आम्ही आहो स्वामीभक्त l
मिरवू नये लोकांत l
जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ l
निशफळ भक्ती तयाची ll
दंभे षोडशोपचारे पूजिता l
प्रिय नव्हेची समर्था l
भावे पत्रपुष्प अर्पिता l
समाधान स्वामीं ते ll
*अध्याय पंधरावा*.
न लगे करणे तीर्थाटन l
हटयोगादीक साधन l
वेदाभ्यास शास्त्रज्ञान l
मोक्ष साधना कारणे ll
अंतरी स्वामीभक्ती जडता l
चारी पुरुषार्थ येती हाता l
पाप ताप दैन्य वार्ता l
तेथे काही नुरेची ll
*अध्याय सतरावा*.
लोकापवादाचे मानी भय l
तो भक्ती करील काय l
प्रेमानंद चित्ता नोहे l
भजनी मन लागेना ll
*अध्याय आठरावा*
धन्य गुरूचें महिमानl
पादुका स्पर्श करोनl
जहाले तत्काळ ब्रम्हज्ञानl
काय धन्यता वर्णावी ll
*अध्याय एकोणिसावा*
उठोनियां करिती स्तुती 
धन्य धन्य हे यतिमूर्ती 
केवळ परमेश्वर असती 
रूप घेती मानवाचे
*अध्याय विसावा*
जय जया जी करूना करा 
जयजयाजी यतिवरा 
भक्तजन संतापहरा
सर्वेश्वरा गुरुराया
*अध्याय एकविसावा*
अंगी सर्वदा विनय वसो
वृथाभिमान तो नसो 
सर्व विद्या सार गवसो
भक्त श्रेष्ठालागुनी

🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮