Monday, October 17, 2011

|| श्री मारुती स्तोत्र || MARUTI STOTRA



रामदास स्वामी रचित || श्री मारुती स्तोत्र ||
भीमरूपी महारूद्रा, वज्रहनुमान मारुती |
वनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजना || ||
महाबळी प्राणदाता, सकळा उठवी बळें |
सौख्यकारी दुःखहारी, धूर्त वैष्णव गायका || ||
दीननाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा |
पातालदेवताहंता भव्यसिंदूर लेपना || ||
लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना |
पुण्यवंता पुण्यशीला, पावना परितोषका || ||
ध्वजांगे उचली बाहो, आवेशे लोटला पुढें |
काळाग्नि काळरुद्रग्नि, देखता कांपति भये || ||
ब्रह्मांन्डें माईली नेणो, आवाळे दंतपंगति |
नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भ्रुकटी ताठिल्या बळें || ||
पुच्छ तें मुर्डिले माथां, किरीटी कुंडले बरीं |
सुवर्ण कटि कांसोटी, घंटा किंकिणी नागरा || ||
ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळूं |
चपळांग पाहतां मोठे, महाविद्युल्लतेपरी || ||
कोटिच्या कोटि उड़्डाणे, झेपावे उत्तरेकडे |
मंद्राद्रीसारिखा द्रोणूं, क्रोधे उत्पाटिला बळे || ||
आणिला मागुती नेला, आला गेला मनोगती |
मनासी टाकिले मागे, गतीसी तुळणा नसे || १० ||
अणूपासोनि ब्रह्मांन्डाएवढा होत जातसे |
तयासी तुळणा कोठे, मेरुमंदर धाकुटे || ११ ||
ब्रह्मंडाभोवते वेढे, वज्रपुच्छे करू शके |
तयासी तुळणा कैची, ब्रह्मांडी पाहता नसे || १२ ||
आरक्त देखिले डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा |
वाढता वाढता वाढे, भेदिले शून्यमंडळा || १३ ||
धनधान्य पशुवृद्धि, पुत्रपौत्र समग्रहि |
पावती रूपविद्यादि, स्तोत्रपाठेकरुनियां || १४ ||
भूतप्रेतसमंधादि, रोगव्याधि समस्तही |
नासती तुटती चिंता, आनंदे भीमदर्शनें || १५ ||
हे धरा पंधराश्लोकी, लाभली शोभली बरी |
दृढदेहो निःसंदेहों, संख्या चंद्रकळा गुणें || १६ ||
रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासि मंडणू |
रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती || १७ ||
||
इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुति स्तोत्रं संपूर्णम् ||

II श्री स्वामी समर्थ तारक मंत्र II Shree Swami Samarth Tarakmantra



निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना |
प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना |
अतर्क्य अवधूत हे स्मर्थगामी |
अशक्य हे शक्य करतील स्वामी ||

जिथे स्वामी चरण, तिथे न्यून काय |
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय |
आज्ञेविन काळही न नेई त्याला |
परलोकी ही ना भीती तयाला ||

उगाची भितोसी भय हे पळू दे |
वसे अंतरी ही स्वामीशक्ती कळू दे |
जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा |
नको घाबरू तू असे बाल त्यांचा ||

खरा होई जागा श्रेद्धे सहीत |
कसा होसी त्याविन तू स्वामी भक्त |
आठव कितीदा दिली त्यांनीच साथ |
नको डगमगू स्वामी देतील हात ||

विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ |
स्वामीच या पंचामृतात |
घे तीर्थ घेई, आठवी रे प्रचीती |
न सोडिती तया, जया स्वामी घेती हाती ||

अशक्य हे शक्य करतील स्वामी ||

|| श्री स्वामी चरणविंदार्पणमस्तु ||

|| सिद्धमंगलस्तोत्र || Divya Siddha Mangala Stotram




|| सिद्धमंगलस्तोत्र ||

१) श्री मदनंत श्रीविभुषीत अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा |
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ||
२) श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा |
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ||
३) माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा |
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ||
४) सत्यऋषीश्वरदुहितानंदन बापनाचार्यनुत श्रीचरणा |
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ||
५) सावित्र काठकचयन पुण्यफला भारद्वाज ऋषी गोत्र संभवा |
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ||
६) दौ चौपाती देव लक्ष्मीगण संख्या बोधित श्रीचरणा |
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ||
७) पुण्यरुपिणी राजमांबासुत गर्भपुण्यफलसंजाता |
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ||
८) सुमतीनंदन नरहरीनंदन दत्तदेव प्रभू श्रीपादा |
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ||
९) पीठिकापुर नित्यविहारा मधुमतीदत्ता मंगलरूपा |
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ||

||
श्रीपादराजमं शरणं प्रपद्ये ||

सिद्धमंगल स्तोत्र हे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे आवडते स्तोत्र आहे.
श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथात सतराव्या अध्यायात हे स्तोत्र येते.
ग्रंथकार शंकर भट म्हणतात," श्री बापनाचार्युलुंना श्री दत्तात्रेयांचे दर्शन घडले व त्यांनी "सिद्धमंगल" स्तोत्र लिहिले. प्रत्यक्ष दत्ताच्या दर्शनाच्या अनुभूतीने गायिली जाणारी या स्तोत्रातील अक्षरे अत्यंत प्रभावशाली आहेत. त्या अक्षरांमधील चैतन्य हे युगानुयुगे विलसत राहिल.
या स्तोत्रात व्याकरण दृष्ट्या कोणताही दोष अथवा त्रुटी नाही. या स्तोत्राचे पठण करण्यासाठी कोणताही विधीनिषेध नाही. मला ते स्तोत्र श्री बापनाचार्युलूच्या मुखातून ऐकण्याचे भाग्य लाभले. हे स्तोत्र माझ्या ह्रदयावर अंकित झाले आहे.

परम पवित्र अशा सिद्धमंगल स्तोत्राचे पठण अनघाष्टमीचे व्रत करुन केल्यास सहस्त्र सदब्राह्मण जेवू घातल्याचे पुण्य प्राप्त होते. तसेच स्वप्नात सिद्ध पुरुषांचे दर्शन होते. याच्या पठणाने मनतील सर्व कामना पुर्ण होतात. जे भक्त मन काया आणि कर्मानी श्री दत्तात्रेयांची आराधना करुन या स्तोत्राचे पठण करतात ते श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेस प्राप्त होतात. तसेच याच्या नियमित गायनाने सूक्ष्म वायुमंडलातील अदृश्य रुपाने संचार करणार्‍या सिद्धी प्राप्त होतात.

 

II श्री देवी अथर्वशीर्ष स्तोत्र II Sri Devi Atharvashirsh श्री देवी अथर्वशीर्ष स्तोत्र



                                  देवी अथर्वशीर्ष स्तोत्र

सर्व देवता मिळोन, पुसती देवी लागोन, महादेवी, तवस्वरूपपूर्ण विषद आम्हा तू करी,   
देवी म्हणे मी शून्य, निराकार निर्गुण, आदीअंतरहितपूर्ण ब्रम्हसनातन मी असे,
प्रकृती मी पुरुषोत्त, आनंद मी अनानंद मी, विज्ञान मी, अज्ञान मी, ऐसे जाणा रूप माझे,
हे दृश्य जे चराचर, मीच नटले साचार, मजविन अणुमात्र, सृष्टीकाही असेना,
पूर्व पश्चिम, दक्षिणोत्तर, उर्ध्व अधर दिशा समग्र, सर्वत्र मी साचार, भरोनी राही सर्वदा,
मीच एकादशरुद्र, अष्टवसू मी दिगंतर, विश्वदेवद्वादशआदित्य, मीच सारे नटलेसे,
त्वष्टा कुशा आणि सोम, ब्रम्हा विष्णू महेश जाण, प्रजापती भगावित्रावरून, मीच सारे नटलेसे,
अग्नि मी अश्विनीकुमार, त्रैलोक्यात करी संचार, संपूर्ण जगदीश्वर, हेची जाणा रूप माझे,
ऐसे ऐकोनी वचन, सर्व देव करिती नमन, नमो देवी म्हणोन, वंदन करिती देवीसि,
अग्निसम दैदिप्यमान, मंगलमयी तू परिपूर्ण, दुर्गादेविते  नमन, आम्हीं सदा करीत असो,
दृष्टीआड राहोनी, विश्व चालवी गुप्तपणे, नकळे कोण जिची करणी, त्या दुर्गेसी ते नमितसो,
असो राजा अथवा रंक, पंडित अथवा मूर्ख, सर्वांसी करी कर्मप्रवृत्त, त्या दुर्गेसी नमितसो,
अगाध सत्ता जिची, उगे राहोनी दे  कवणासी, कर्मी बांधी जीवांशी, त्या दुर्गेते  नमितसो,
तृणापासोनी ब्रम्हापर्यंत, भूचर जलचर खेचर, मानवा आणितर, सर्वा कर्मी लावीतसे,
प्राणरूप, चैतन्यरूप, आनंदकामधेनुरूप, अन्नबलस्वरूपदेत, त्या दुर्गेते नमितसो,
काळाचा करी नाश, म्हणोनी वेद स्तवित, शिवशक्ती, ब्रम्हशक्ती ऐक्य,  दुर्गे देवी नमोस्तुते,  
महालक्ष्मै विद्महे, सर्वशक्त्यै धीमहि,  तन्नो देवी प्रचोदयात,
ऐसी महाशक्ती परात्पर, विश्वमोहिनी पाशांकुशधर, ऐसे म्हणोनी अमर, स्तवन करिती दुर्गेचे,
इल ह्रीं सकलहर ह्रीं सकलह्रीं, ऐशा असे महाविद्या, श्रीविद्या, ब्रह्मविद्या, महात्रिपुरसुंदरीसदया प्रसन्ना जाणा होतसे,
ऐशा अंबेचे चिंतन, जे करिती मनापासून, त्यांचे दुःख आणि दैन्य, दूर जाणा होतसे,
ही दुर्गा दुर्गतीहारिणी, सदैव रक्षी आम्हालागोनी, ऐसे म्हणोनी चरणी, देव वंदिते जाहले,
हे  संपूर्ण विश्व श्रीदुर्गेचे स्वरूप होय, अष्टवसू इंद्रचंद्रसूर्य, दुर्गा जाणा निर्धारे,
पापहारिणी देवी, सर्व सौभाग्यदायिनी, सर्वमंगलस्वरूपिणी, दुर्गा जाणा निश्चये,
तिसी जाता शरण, होई परम कल्याण, ऐसे म्हणोनी देवगण, प्रणाम करिती देवीते,
ह्रीं म्हणावा मंत्र, अथवा  ह्रीं मंत्राचा जप, यानेची कृपा साध्य होत,  दुर्गा सांगे देवांते,
ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे, आणखी मंत्र हा तुम्हा देते, सर्वार्थ ह्याने साधते,  दुर्गा म्हणे देवांसी,
ऐकोनी  देवीचे वचन, देवता संतोष पावोन, जय जय दुर्गे म्हणोन, वंदन करिती तिजलागी,
आरुणीसमान प्रभायुक्त पाशांकुशउभयहस्त वरदअभयमुद्रास्तित, मनोहर रूप दुर्गेचे,
आरक्त वस्त्र नेसली,  त्रिनेत्र चंद्रकोर भाळी, महादेवी करुणामयी, वंदन तू ते करीतसे
नमितो तू ते महादेवी, महाभयविनाशिनी, महासंकटहारिणी,  दुर्गे देवी नमोस्तुते,
ब्रम्हदिका नकळे पार, अजन्मा अनंत मनोहर, अलक्ष्या, आज्ञेया सर्वत्र,  एकली पहा राहतसे,
एकली राहे म्हणोनी एका,  विश्वरूपिनी म्हणोनी अनैका, सर्वमंत्रातीलमात्रिका, ऐसे पहा देविती,
चिन्मयरुपा सर्वसाक्षिणी, शून्यातहीशून्या साक्षिनी, सर्वपरतरमपाहे ती ते दुर्गा म्हणतसे,
संसारार्णव तारक, दुराचार असुरनाशक, त्या दुर्गेसी शरणागत होवोनी नमन करीतसे,
अथर्वशीर्ष स्तोत्र देवीचे, पठण करिता मनोवाचे, पंचदेवता स्तोत्राचे पुण्य प्राप्त होतसे,
अष्टोत्तरशत पाठ करिता पुण्य अदभूत, सर्व संकटे टळत कृपाप्रसादे दुर्गेच्या,
प्रातःकाळी करिता पाठ, पाप त्यासी लागत, रात्री करिता पाठ अपार पुण्य मिळतस,
मध्यरात्री करिता पाठ,  वाकसिद्धी होतसे प्राप्त, मूर्तिसन्निध पाठ,  प्राणप्रतिष्ठा होतसे,
अमृतसिद्धी पाहोनी, महादेवी सन्निधानी, करावा पाठ त्यादिनी, महामृत्युते जिंकावया,
ऐसे हे उपनिषद, देविदेवतांचा संवाद, ही गुप्त विद्या प्रकटत ईश्वर भकता कारणे.