Monday, October 17, 2011

II श्री देवी अथर्वशीर्ष स्तोत्र II Sri Devi Atharvashirsh श्री देवी अथर्वशीर्ष स्तोत्र



                                  देवी अथर्वशीर्ष स्तोत्र

सर्व देवता मिळोन, पुसती देवी लागोन, महादेवी, तवस्वरूपपूर्ण विषद आम्हा तू करी,   
देवी म्हणे मी शून्य, निराकार निर्गुण, आदीअंतरहितपूर्ण ब्रम्हसनातन मी असे,
प्रकृती मी पुरुषोत्त, आनंद मी अनानंद मी, विज्ञान मी, अज्ञान मी, ऐसे जाणा रूप माझे,
हे दृश्य जे चराचर, मीच नटले साचार, मजविन अणुमात्र, सृष्टीकाही असेना,
पूर्व पश्चिम, दक्षिणोत्तर, उर्ध्व अधर दिशा समग्र, सर्वत्र मी साचार, भरोनी राही सर्वदा,
मीच एकादशरुद्र, अष्टवसू मी दिगंतर, विश्वदेवद्वादशआदित्य, मीच सारे नटलेसे,
त्वष्टा कुशा आणि सोम, ब्रम्हा विष्णू महेश जाण, प्रजापती भगावित्रावरून, मीच सारे नटलेसे,
अग्नि मी अश्विनीकुमार, त्रैलोक्यात करी संचार, संपूर्ण जगदीश्वर, हेची जाणा रूप माझे,
ऐसे ऐकोनी वचन, सर्व देव करिती नमन, नमो देवी म्हणोन, वंदन करिती देवीसि,
अग्निसम दैदिप्यमान, मंगलमयी तू परिपूर्ण, दुर्गादेविते  नमन, आम्हीं सदा करीत असो,
दृष्टीआड राहोनी, विश्व चालवी गुप्तपणे, नकळे कोण जिची करणी, त्या दुर्गेसी ते नमितसो,
असो राजा अथवा रंक, पंडित अथवा मूर्ख, सर्वांसी करी कर्मप्रवृत्त, त्या दुर्गेसी नमितसो,
अगाध सत्ता जिची, उगे राहोनी दे  कवणासी, कर्मी बांधी जीवांशी, त्या दुर्गेते  नमितसो,
तृणापासोनी ब्रम्हापर्यंत, भूचर जलचर खेचर, मानवा आणितर, सर्वा कर्मी लावीतसे,
प्राणरूप, चैतन्यरूप, आनंदकामधेनुरूप, अन्नबलस्वरूपदेत, त्या दुर्गेते नमितसो,
काळाचा करी नाश, म्हणोनी वेद स्तवित, शिवशक्ती, ब्रम्हशक्ती ऐक्य,  दुर्गे देवी नमोस्तुते,  
महालक्ष्मै विद्महे, सर्वशक्त्यै धीमहि,  तन्नो देवी प्रचोदयात,
ऐसी महाशक्ती परात्पर, विश्वमोहिनी पाशांकुशधर, ऐसे म्हणोनी अमर, स्तवन करिती दुर्गेचे,
इल ह्रीं सकलहर ह्रीं सकलह्रीं, ऐशा असे महाविद्या, श्रीविद्या, ब्रह्मविद्या, महात्रिपुरसुंदरीसदया प्रसन्ना जाणा होतसे,
ऐशा अंबेचे चिंतन, जे करिती मनापासून, त्यांचे दुःख आणि दैन्य, दूर जाणा होतसे,
ही दुर्गा दुर्गतीहारिणी, सदैव रक्षी आम्हालागोनी, ऐसे म्हणोनी चरणी, देव वंदिते जाहले,
हे  संपूर्ण विश्व श्रीदुर्गेचे स्वरूप होय, अष्टवसू इंद्रचंद्रसूर्य, दुर्गा जाणा निर्धारे,
पापहारिणी देवी, सर्व सौभाग्यदायिनी, सर्वमंगलस्वरूपिणी, दुर्गा जाणा निश्चये,
तिसी जाता शरण, होई परम कल्याण, ऐसे म्हणोनी देवगण, प्रणाम करिती देवीते,
ह्रीं म्हणावा मंत्र, अथवा  ह्रीं मंत्राचा जप, यानेची कृपा साध्य होत,  दुर्गा सांगे देवांते,
ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे, आणखी मंत्र हा तुम्हा देते, सर्वार्थ ह्याने साधते,  दुर्गा म्हणे देवांसी,
ऐकोनी  देवीचे वचन, देवता संतोष पावोन, जय जय दुर्गे म्हणोन, वंदन करिती तिजलागी,
आरुणीसमान प्रभायुक्त पाशांकुशउभयहस्त वरदअभयमुद्रास्तित, मनोहर रूप दुर्गेचे,
आरक्त वस्त्र नेसली,  त्रिनेत्र चंद्रकोर भाळी, महादेवी करुणामयी, वंदन तू ते करीतसे
नमितो तू ते महादेवी, महाभयविनाशिनी, महासंकटहारिणी,  दुर्गे देवी नमोस्तुते,
ब्रम्हदिका नकळे पार, अजन्मा अनंत मनोहर, अलक्ष्या, आज्ञेया सर्वत्र,  एकली पहा राहतसे,
एकली राहे म्हणोनी एका,  विश्वरूपिनी म्हणोनी अनैका, सर्वमंत्रातीलमात्रिका, ऐसे पहा देविती,
चिन्मयरुपा सर्वसाक्षिणी, शून्यातहीशून्या साक्षिनी, सर्वपरतरमपाहे ती ते दुर्गा म्हणतसे,
संसारार्णव तारक, दुराचार असुरनाशक, त्या दुर्गेसी शरणागत होवोनी नमन करीतसे,
अथर्वशीर्ष स्तोत्र देवीचे, पठण करिता मनोवाचे, पंचदेवता स्तोत्राचे पुण्य प्राप्त होतसे,
अष्टोत्तरशत पाठ करिता पुण्य अदभूत, सर्व संकटे टळत कृपाप्रसादे दुर्गेच्या,
प्रातःकाळी करिता पाठ, पाप त्यासी लागत, रात्री करिता पाठ अपार पुण्य मिळतस,
मध्यरात्री करिता पाठ,  वाकसिद्धी होतसे प्राप्त, मूर्तिसन्निध पाठ,  प्राणप्रतिष्ठा होतसे,
अमृतसिद्धी पाहोनी, महादेवी सन्निधानी, करावा पाठ त्यादिनी, महामृत्युते जिंकावया,
ऐसे हे उपनिषद, देविदेवतांचा संवाद, ही गुप्त विद्या प्रकटत ईश्वर भकता कारणे.



1 comment:

  1. Blackjack | Casino Games at Real Money Casinos
    In our blackjack review, we will cover the 스포츠 토토 사이트 casino 네온벳 games offered by 애니팡 포커 the casino and the minimum pci e 슬롯 wager amount. The minimum payout is $100, and the maximum bet is $50. The casino 인디언포커

    ReplyDelete