Friday, March 9, 2012

प्रार्थना



 
प्रार्थना

हे अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज
सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज
मी आपणास स्मरून , साक्षी ठेवून,
आवाहन करून असे नम्रतापूर्वक सांगतो की,
आपण माझ्या मनात व आत्म्यात प्रवेश करा व
मला आशीर्वादीत  करा.
माझ्या कुटुंबियांच्या मनात व आत्म्यात प्रवेश करून
त्यांनाही आशीर्वादित करा.
माझ्यात व कुटुंबियांमध्ये प्रेम, सहकार्य व
संघटीतपणाची भावना वाढीस लागून त्याद्वारे आम्हीं
एकमेकांना आनंद देवू असा आशीर्वाद द्या.
आपणच मला योग्य मार्गावरून न्याल व
योग्य जीवनासाठी लागणारे आवश्यक ते बदल
घडवून आणल याची मला खात्री आहे.
जीवनातील प्रत्येम आनंद व दु:खाच्या क्षणी
आपण मला संभाळाल  व मानसिक समतोल ठेवण्यास
मदत कराल याची मला खात्री आहे.
मी आपणास समर्पित आहे म्हणून आपण सदैव
माझ्यासोबत आहात आणि म्हणूनच
कुठल्याही संकटावर, दु:खावर, पराभवावर
मत करेन व विजयीच होईन याची मला खात्री आहे.
आपण केलेल्या कृपेसाठी उतराई  व्हावे म्हणून
कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी तन मन धनाने
आपल्या कार्यात सहभागी व्हावे व तशी मला
सद्बुद्धी व्हावी असं मला आशीर्वाद द्या.
आपली कृपा, आशीर्वाद व मार्गदर्शनाने मी निर्भय आहे
आणि म्हणूनच मी आपला आभारी आहे कृतज्ञ आहे.


No comments:

Post a Comment