🙏|| श्री स्वामी समर्थ ||🙏
श्री स्वामी समर्थ अष्टक
असे पातकी दीन मी स्वामीराया, पदी पातलो सिध्द व्हा उध्दराया II
नसे अन्य त्राता जगी या दीनाला, समर्थां तुझ्याविण प्रार्थु कुणाला...?
मला माय ना बाप ना आप्त बंधु, सखासोयरा सर्व तू दीनबंधू
तुझा मात्र आधार या लेकराला, समर्थां तुझ्यावीण प्रार्थु कुणाला...?
नसे शास्त्र, विद्या कलादीक काही, नसे ज्ञान वैराग्य ते सर्वथाही
तुझे लेकरु ही अहंता मनाला, समर्थां तुझ्याविण प्रार्थू कुणाला....?
प्रपंची पूरा बध्द झालो दयाळा, तुझा दास मी ही स्मृती ना मनाला
क्षमेची असे याचना त्वत्पदाला, समर्थां तुझ्याविण प्रार्थू कुणाला...?
मला कामक्रोधादी नागवीले, म्हणोनी समर्थां तुला जागवले
नको दूर लोटू तुझ्या सेवकाला, समर्थां तुझ्याविण प्रार्थू कुणाला....?
नको अंत पाहू त्वरे धाव घेई, तुझ्याविना नाही दुजी श्रेष्ठ आई
अनाथासी आधार तुझा दयाळा, समर्थां तुझ्याविण प्रार्थू कुणाला. ..?
कधी गोड वाणी न ये मुखाला, कधी द्रव्य ना अर्पिले याचकाला
कधी मूर्ती तुझी न ये लोचनाला, समर्थां तुझ्याविण प्रार्थू कुणाला...?
मला एवढी घाल भिक्षा समर्थां, मुखे नित्य गावी तुझी गुणगाथा
घडो पादसेवा तुझी किंकराला, समर्थां तुझ्याविण प्रार्थू कुणाला...?
🙏|| श्री स्वामी समर्थ ||🙏💐
joya shoes 923l3mqsqp195 afslappet,STØVLER,STÖVLAR,csizma,botas,gewoontjes,camminando,mode baskets,gehen,stiefel joya shoes 862g4bqptc611
ReplyDeleteYachyamadhe kutle kutle shabda chukiche ahet
ReplyDeleteShree swami samarth
ReplyDeleteThanks and I have a super offer you: How To Renovate House Exterior house renovation tax deduction
ReplyDelete